चिकनचे तुकडे एका भांड्यात घ्या. त्यात दही, आलं-लसूण पेस्ट, मीठ आणि थोडी काळी मिरी घालून नीट मिसळा आणि मॅरिनेट होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
काजू 10–15 मिनिटे गरम पाण्यात भिजवा आणि नंतर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत बटर किंवा तेल गरम करा. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मंद आचेवर हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
कांदा शिजल्यानंतर त्यात आलं-लसूण पेस्ट घाला. नंतर काजू पेस्ट घालून 2–3 मिनिटे मंद आचेवर परतून घ्या.
Picture Credit: Pinterest
आता मॅरिनेट केलेले चिकन कढईत घाला. झाकण ठेवून मध्यम आचेवर 8–10 मिनिटे चिकन शिजू द्या.
Picture Credit: Pinterest
चिकन शिजल्यानंतर त्यात फ्रेश क्रीम (मलाई), गरम मसाला आणि थोडी काळी मिरी घाला. थोडे पाणी घालून ग्रेव्ही तयार करा.
Picture Credit: Pinterest
भाजी मंद आचेवर 2–3 मिनिटे उकळू द्या. वरून कोथिंबीर घालून गरमागरम मलाई चिकन भाजी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest