स्नॅक टाइमसाठी परफेक्ट: मोझरेला स्टिक्स रेसिपी

Life style

32 January 2026

Author:  नुपूर भगत

मोझरेला चीज लांबट स्टिक्सच्या आकारात कापून घ्या आणि 15–20 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, त्यामुळे तळताना चीज वितळणार नाही.

चीज कापा 

Picture Credit: Pinterest

एका बाउलमध्ये मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, काळी मिरी आणि लाल तिखट घालून थोडं पाणी टाकून जाडसर पीठ तयार करा.

साहित्य एकत्र करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या प्लेटमध्ये ब्रेडक्रम्ब्स घ्या आणि त्यात ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स मिसळा.

ब्रेडक्रम्ब्स घ्या 

Picture Credit: Pinterest

प्रत्येक मोझरेला स्टिक आधी मैद्याच्या पिठात बुडवा आणि नंतर ब्रेडक्रम्ब्समध्ये नीट घोळवा.

चीजला मिश्रणात बुडवा 

Picture Credit: Pinterest

अधिक कुरकुरीतपणासाठी पुन्हा एकदा स्टिक मैद्याच्या पिठात आणि ब्रेडक्रम्ब्समध्ये घोळवून घ्या (डबल कोटिंग).

डबल कोटिंग

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा आणि मध्यम आचेवर मोझरेला स्टिक्स सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

स्टीक्स तळून घ्या

Picture Credit: Pinterest

तळलेले स्टिक्स टिश्यू पेपरवर काढा. गरमागरम मोझरेला स्टिक्स केचप किंवा डिपसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest