घरच्या घरी बनवा कुरकुरीत बटाटा चिप्स

Life style

18 July 2026

Author:  नुपूर भगत

बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. चिप्स कटर किंवा धारदार सुरीने अगदी पातळ काप करून घ्या.

बटाटे सोलून घ्या

Picture Credit: Pinterest

काप थंड पाण्यात १५–२० मिनिटे भिजत ठेवा. यामुळे अतिरिक्त स्टार्च निघून जातो आणि चिप्स अधिक कुरकुरीत होतात.

थंड पाण्यात भिजत ठेवा

Picture Credit: Pinterest

भिजवलेले काप स्वच्छ पाण्याने धुऊन किचन टॉवेलवर पसरवा. पूर्णपणे कोरडे होईपर्यंत पुसून घ्या.

काप पुसून घ्या

Picture Credit: Pinterest

कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा. तेल योग्य तापमानाला आल्यावर बटाट्याचे काप थोडे-थोडे करून टाका.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

चिप्स हलक्या हाताने परतवत सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

चिप्स तळा 

Picture Credit: Pinterest

तळलेले चिप्स टिश्यू पेपरवर काढा, जेणेकरून अतिरिक्त तेल शोषले जाईल. थोडे थंड झाल्यावर डब्यात साठवा.                                                                                                     

चिप्सचा आस्वाद घ्या

Picture Credit: Pinterest