घरच्या घरी बनवा पारंपरिक महाराष्ट्रीयन वांग्याचं भरीत

Life style

24 May 2026

Author:  नुपूर भगत

वांग्याला हलकेसे तेल लावून गॅसवर सर्व बाजूंनी चांगलं भाजून घ्या. साल पूर्ण काळपट झाली की वांगं मऊ होतं.

वांग्याला भाजा

Picture Credit: Pinterest

भाजलेलं वांगं थंड झाल्यावर त्याची साल काढा आणि आतला गर एका भांड्यात कुस्करून घ्या.

वांग्याची साल काढा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात ठेचलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्या.

हिरव्या मिरच्या आणि लसूण

Picture Credit: Pinterest

यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो हलका गुलाबी होईपर्यंत परता.

कांदा परता 

Picture Credit: Pinterest

आता कुस्करलेलं वांगं कढईत घाला आणि सर्व मिश्रण व्यवस्थित हलवा.

कुस्करलेलं वांगं 

Picture Credit: Pinterest

त्यात शेंगदाणा कूट आणि मीठ घालून ३–४ मिनिटं मंद आचेवर शिजू द्या, जेणेकरून सर्व चव एकजीव होईल.

शेंगदाणा कूट

Picture Credit: Pinterest

शेवटी वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि गरम भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest