By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 29 Jan, 2025
पनीर हा पदार्थ अनेकांच्या आवडीचा आहे, यापासून अनेक पदार्थ बनवले जातात
अनेकांना ढाब्यावरची पनीर भुर्जी खायला फार आवडते, ही तुम्ही घरीदेखील सहज बनवू शकता
पनीर, कांदा, टोमॅटो, बेसन, मीठ, तेल, हळद, लाल तिखट, दही, दूध, कसुरी मेथी, कोथिंबीर इ.
यासाठी प्रथम पनीरचा बारीक चुरा करून घ्या
एका भांड्यात बेसन, कसुरी मेथी, हळद, लाला तिखट, मीठ, दूध, दही एकत्र करून मिक्स करा
आता एका कढईत बटर घालून यात चिरलेला कांदा परतून घ्या
यानंतर यात हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो टाकून शिजवून घ्या
शेवटी यात एकत्रित मसाल्याचा घोळ, कोथिंबीर आणि पनीरचा चुरा घाला आणि मिक्स करा
काहीवेळ शिजवून गॅस बंद करा आणि तयार पनीर भुर्जी खाण्यासाठी सर्व्ह करा