Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
फ्रेंच टोस्ट हा एक लोकप्रिय नाश्त्याचा प्रकार आहे, जो ब्रेडपासून तयार केला जातो
४ ब्रेड स्लाइस, २ अंडी, १/२ कप दूध, २ टेबलस्पून साखर, १/२ टीस्पून दालचिनी पूड, चिमूटभर मीठ, आणि तूप/लोणी.
एका बाउलमध्ये अंडी फोडा. त्यात दूध, साखर, मीठ आणि दालचिनी पूड टाका. नीट फेटा.
ब्रेड स्लाइस मिक्समध्ये दोन्ही बाजूंनी नीट भिजवा. जास्त वेळ ठेवू नका, नाहीतर ब्रेड फुटेल.
नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यात थोडं तूप किंवा लोणी घाला.
एक बाजू सोनेरी झाल्यावर पलटवा आणि दुसरी बाजूही खरपूस भाजा आणि प्लेटमध्ये काढा
वरून मध, साखर पावडर, फळांचे तुकडे किंवा चॉकलेट सिरप घालून सर्व्ह करा.