By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 1 Feb, 2025
श्रीखंड हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. हा गोड पदार्थ तुम्ही घरीदेखील अगदी सहज बनवू शकता
दूध, पीठीसाखर, वेलची पूड, सुका मेवा, केशर इ.
यासाठी प्रथम 1 लिटर दूध उकळवून त्याचे दही तयार करुन घ्या
यानंतर एक चाळणी घेऊन यात एक कापड ठेवा आणि यात तयार दही ओता
आता हे कापड 1 तास खुंटीला लटकवा, ज्यामुळे यातील पाणी निघून जाईल आणि दह्याचा चक्का तयार होईल
तयार दही फेटा आणि मग यात पीठीसाखर, वेलची पूड घालून पुन्हा फेटून घ्या
चव वाढवण्यासाठी दूधात केशर मिक्स करून हे मिश्रण दह्यात घाला
तयार श्रीखंड एका वाटीत काढा आणि यावर सुक्या मेव्याचे तुकडे पसरून खाण्यासाठी सर्व्ह करा