www.navarashtra.com

By Nupur Bhagat

संध्याकाळच्या चहाची मजा वाढवा! घरी बनवा कुरकुरीत खेकडा भजी

Pic Credit -   Pinterest

Published 31 Jan, 2025

संध्याकाळ झाली की आपल्याला हलकी हलकी भूक लागू लागते

संध्याकाळचा नाश्ता

या भुकेला शमवण्यासाठी तुम्ही एक हटके आणि कुरकुरीत असा पदार्थ घरी ट्राय करू शकता

खेकडा भजी

चिरलेला कांदा, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, मीठ, तेल, कोथिंबीर, पाणी, ओवा, तिखट, हळद इ.

साहित्य

यासाठी प्रथम कांदे उभे पातळ चिरून घ्या

कांदे लांब चिरा

आता या चिरलेल्या कांद्यामध्ये मीठ घालून 10-15 मिनिटे बाजूला ठेवून द्या

मीठ

कांद्याला पाणी सुटू लागले की यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, हळद, ओवा, तिखट, कोथिंबीर घालून मिक्स करा

एकजीव करा

आवश्यकतेनुसार यात हलके पाणी घाला आणि भजींप्रमाणे याचे जाडसर पीठ मळून घ्या

पाणी

आता कढईत तेल टाकून तयार मिश्रणाचे भजी यात सोडा

तेल

भजींना मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळा आणि गरमा गरम भजी खाण्यासाठी सर्व्ह करा

तळा