भाकरीसोबत खायला बनवा झणझणीत गावरान खार वांग

Life style

30 August 2026

Author:  नुपूर भगत

वांगी स्वच्छ धुवून त्यांचे देठ काढा. वांगी उभी चिरून घ्या, मात्र तुकडे पूर्णपणे वेगळे करू नका.

वांग्यांची तयारी करा

Picture Credit: Pinterest

कांदा बारीक चिरून घ्या. लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घ्या. गावरान चव येण्यासाठी लसूण-मिरची वाटून घेतल्यास भाजी अधिक खमंग लागते.

कांदा आणि लसूण 

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घाला. फोडणी तडतडल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून तो सोनेरी होईपर्यंत परता.

फोडणी द्या

Picture Credit: Pinterest

 ठेचलेला लसूण, हिरवी मिरची घालून काही मिनिटे परता. मग हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि गोडा मसाला घालून मंद आचेवर मसाला शिजवून घ्या.

 मसाला भाजा

Picture Credit: Pinterest

तयार मसाल्यात चिरलेली वांगी घाला आणि मसाला वांग्यांना व्यवस्थित लागेल असे हलक्या हाताने परता. कोथिंबीर, मीठ घालून झाकण ठेवा.

 वांगी घाला

Picture Credit: Pinterest

वांगी स्वतःचे पाणी सोडतील. गरज असल्यास थोडे पाणी घाला आणि मंद आचेवर वांगी मऊ होईपर्यंत शिजवा.

भाजी शिजवा

Picture Credit: Pinterest

 गरमागरम खार वांग भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत वाढा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest