नाश्त्याला घरी बनवा गुजराती स्टाईल खमण ढोकळा

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

पिवळा ढोकळा तर तुमच्या बऱ्याचदा खाल्ला असेल मात्र तुम्ही कधी तांदळाच्या पिठाचा पांढरा ढोकळा खाल्ला आहे का?

ढोकळा 

हा चवीला फार अप्रतिम लागतो आणि झटपट बनून तयारही होतो

चव

तांदूळ, उडदाची डाळ, दही, मीठ, तेल, राई, हिरवी मिरची, कढीपत्ता, हिंग, कोथिंबीर, किसलेल खोबर इ.

साहित्य

यासाठी प्रथम तांदूळ आणि उडदाची डाळ काही तास भिजवून मग याची पेस्ट वाटून घ्या

पेस्ट 

वाटलेल्या मिश्रणात मीठ आणि दही घालून मिक्स करा. यानंतर एका भांड्याला तेल लावून त्यात हे मिश्रण टाका

मिक्स करा

कुकरमध्ये पाणी उकळवून हे भांडे त्यात ठेवा आणि मग 15 20 मिनिटे स्टीम करा

स्टीम करा

फोडणीसाठी एका भांड्यात तेल टाकून त्यात राई, हिरवी मिरची, कढिपत्ता आणि हिंग घाला

फोडणी

ढोकळा स्टीम करून थंड झाला की त्यावर ही फोडणी आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि तयार ढोकळा खाण्यासाठी सर्व्ह करा

सर्व्ह करा