Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
मोमोज हा लहान मुलांचा आवडीचा पदार्थ आहे. मैदा आरोग्यासाठी चांगला नाही अशात तुम्ही गव्हापासून टेस्टी मोमोज तयार करू शकता
यासाठी सर्वप्रथम गव्हाच्या पिठात मीठ घालून पीठ चांगले मळून घ्या
एक कढईत तेल टाकून यात चिरलेला कांदा, कोबी, शिमला मिरची परतून घ्या
मग यात सोया सॉस, मीठ, आलं-लसूण-मिरची पेस्ट आणि मिरपूड घालून मिसळून घ्या
आता तयार पिठाचे गोळे तयार करून पुरीप्रमाणे लाटून घ्या
लाटलेल्या पुऱ्यांमधे स्टाफिंग भरा आणि किनाऱ्यांना फोल्ड करत मोमोज तयार करा
तयार मोमोज तुमच्या आवडीनुसार स्टीम किंवा फ्राय करा
शेजवान चटणीसोबत तयार मोमोज खाण्यासाठी सर्व्ह करा