पार्टी स्पेशल घरी  बनवा सोया चिली

Life style

21 December, 2025

Author:  नुपूर भगत

पाण्यात थोडे मीठ घालून सोया चंक्स 5 मिनिटे उकडून घ्या. नंतर पाणी पिळून ठेवा.

सोया चंक्स उकडणे

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून उकडलेले सोया चंक्स हलके तळून सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्या.

सोया चंक्स तळणे 

Picture Credit: Pinterest

त्याच कढईत थोडे तेल घालून बारीक चिरलेले लसूण आणि हिरवी मिरची परतून घ्या.

भाज्या परतणे

Picture Credit: Pinterest

उभा चिरलेले कांदा आणि शिमला मिरची घालून हाय फ्लेमवर 2-3 मिनिटे परतून घ्या.

कांदा-शिमला मिरची 

Picture Credit: Pinterest

सोया सॉस, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप आणि शेजवान चटणी घालून नीट मिसळा.

सॉस घालणे

Picture Credit: Pinterest

चमचाभर कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात मिसळून कढईत घाला आणि आवश्यक तेवढे पाणी घालून उकळी आणा.

ग्रेव्ही तयार करणे

Picture Credit: Pinterest

तळलेले सोया चंक्स घालून 2-3 मिनिटे शिजवा. गरमागरम सोया चिली सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest