Written By: Nupur Bhagat
Source: Pinterest
पिठलं भाकरी हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतील एक लोकप्रिय आणि चवदार पदार्थ आहे. याची रेसिपीही फार सोपी आहे
कांदा, बेसन, हिरवी मिरची, लसूण, मीठ, तेल, हळद, जिरं, मोहरी, हिंग, कोथिंबीर, बाजरी/ज्वारीचं पीठ
यासाठी प्रथम एका भांड्यात बेसन, हळद आणि पाणी घालून एक द्रावण तयार करा
आता कढईत तेल घालून त्यात जिरं, हिंग, मोहरी, मिरची-लसणाचा ठेचा घालून परतून घ्या
यानंतर यात चिरलेला कांदा आणि मीठ घालून साहित्य छान शिजवून घ्या
शेवटी यात बेसनाचे द्रावण आणि चिरलेली कोथिंबीर घालून पिठलं 10-15 मिनिटे वाफवून घ्या
बाजरी अथवा ज्वारीच्या पिठात चिमूटभर मीठ घालून पीठ मळा आणि याची भाकरी वळून घ्या
तयार भाकरी गरम तव्यावर खरपूस भाजा आणि पिठल्यासोबत खाण्यासाठी सर्व्ह करा