झटपट आणि चविष्ट मटर कचोरी रेसिपी

Life style

1 January 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मैदा, मीठ आणि तेल घालून चोळून घ्या. नंतर थोडे थोडे पाणी घालून घट्ट पीठ मळून झाकून ठेवा.

पीठ मळा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून त्यात जिरे घाला. जिरे तडतडले की आले आणि  हिरवी मिरची घालून परतून घ्या.

तडका द्या

Picture Credit: Pinterest

त्यात उकडलेले आणि भरड वाटलेले मटर घालून नीट परतून घ्या.

मटर घाला 

Picture Credit: Pinterest

आता धणे पूड, जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, आमचूर पावडर आणि मीठ घालून मिश्रण कोरडे होईपर्यंत शिजवा.

साहित्य शिजवा

Picture Credit: Pinterest

मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करा. प्रत्येक गोळा थोडा लाटून त्यात मटरचे सारण भरा आणि कचोरी बंद करा.

कचोरी भरा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मंद आचेवर कचोऱ्या सोनेरी रंग येईपर्यंत तळा.

कचोरी तळा

Picture Credit: Pinterest

तयार मटर कचोरी किचन पेपरवर काढा. गरमागरम कचोरी हिरवी चटणी किंवा चिंचेच्या चटणीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest