मैदा, मीठ आणि पाणी घालून मऊ पीठ मळा. ते 15-20 मिनिटं झाकून ठेवा.
Picture Credit: Pinterest
फिलिंगसाठी कढईत थोडं तेल गरम करून आले-लसूण पेस्ट परता, भाज्या किंवा चिकन, मीठ आणि मिरी पावडर घालून थंड होऊ द्या.
Picture Credit: Pinterest
पीठाचे छोटे गोळे करून पातळ पुरी लाटा. त्यात फिलिंग भरून मोमोच्या आकारात बंद करा.
Picture Credit: Pinterest
तयार मोमो स्टीमरमध्ये 10-12 मिनिटं वाफवून घ्या.
Picture Credit: Pinterest
एका भांड्यात दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, कसुरी मेथी आणि तेल घालून मॅरिनेशन तयार करा.
Picture Credit: Pinterest
वाफवलेले मोमो या मॅरिनेशनमध्ये हलक्या हाताने मिक्स करून 10 मिनिटं मुरू द्या.
Picture Credit: Pinterest
तंदूर/ओव्हन किंवा तव्यावर थोडं तेल लावून हे मोमो हलकेसे भाजून घ्या, जोपर्यंत त्यांना तंदूरी रंग येत नाही.
Picture Credit: Pinterest