घरच्या घरी मलाई कुल्फी बनवण्याची रेसिपी! 

Life style

20 March 2026

Author:  नुपूर भगत

एका जाड बुडाच्या पातेल्यात दूध गरम करायला ठेवा आणि मध्यम आचेवर उकळी येऊ द्या.

दूध गरम करा

Picture Credit: Pinterest

दूध सतत हलवत ठेवा आणि ते अर्धे होईपर्यंत आटवा, जेणेकरून ते घट्ट आणि क्रीमी होईल.

दूध आटवा 

Picture Credit: Pinterest

आता त्यात साखर आणि कंडेन्स्ड मिल्क घाला आणि नीट मिक्स करा.

साखर घाला

Picture Credit: Pinterest

कॉर्नफ्लोअर दुधात मिसळून ते मिश्रणात घाला, त्यामुळे कुल्फीला छान टेक्स्चर येईल.

कॉर्नफ्लोअर घाला

Picture Credit: Pinterest

वेलची पूड, बदाम आणि पिस्ते घालून सर्व मिश्रण चांगले ढवळा.

वेळची पूड घाला

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या आणि मग कुल्फीच्या साच्यात किंवा छोट्या ग्लासमध्ये ओता.

साच्यात मिश्रण घाला 

Picture Credit: Pinterest

हे साचे 6-8 तासांसाठी फ्रीजरमध्ये ठेवा. कुल्फी सेट झाल्यावर बाहेर काढून सर्व्ह करा.

फ्रीजमध्ये सेट करा

Picture Credit: Pinterest