फक्त काही मिनिटांत तयार होईल मऊसूत रवा इडली

Life style

12 August 2026

Author:  नुपूर भगत

कढईत रवा घालून मंद आचेवर ३-४ मिनिटे हलका भाजून घ्या. रव्याचा रंग बदलू देऊ नका. भाजलेला रवा एका भांड्यात काढा.

रवा भाजून घ्या 

Picture Credit: Pinterest

रव्यामध्ये दही, मीठ, हिरवी मिरची आणि आलं घालून सर्व साहित्य एकत्र करा. त्यात थोडे थोडे पाणी घालून मध्यम घट्टसर मिश्रण तयार करा.

 इडलीचे मिश्रण तयार

Picture Credit: Pinterest

तयार मिश्रण १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. रवा दही आणि पाणी शोषून घेईल. गरज वाटल्यास थोडे पाणी घालून मिश्रण एकजीव करा.

मिश्रणाला विश्रांती द्या 

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून मोहरी, उडीद डाळ घाला. काजू हलके सोनेरी झाले की ही फोडणी रव्याच्या मिश्रणात घालून व्यवस्थित मिसळा.

फोडणी तयार करा 

Picture Credit: Pinterest

इडली वाफवण्याच्या अगदी आधी मिश्रणात इनो घाला. त्यावर एक चमचा पाणी टाकून हलक्या हाताने एकाच दिशेने मिसळा. 

इनो मिसळा 

Picture Credit: Pinterest

इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावून त्यात मिश्रण भरा. गरम केलेल्या इडलीपात्रात साचे ठेवून मध्यम आचेवर १०-१२ मिनिटे वाफवून घ्या.

इडल्या वाफवून घ्या 

Picture Credit: Pinterest

थोड्या थंड झाल्यावर इडल्या साच्यातून काढून नारळाची चटणी आणि सांबारसोबत सर्व्ह करा.

 गरमागरम सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest