By Nupur Bhagat
Pic Credit - Pinterest
Published 26 Feb, 2025
मसालेदार आणि रसरशीत शेवभाजी अनेकांच्या आवडीची आहे
आज आपण शेवभाजीची अत्यंत सोपी पण चविष्ट अशी रेसिपी जाणून घेणार आहोत
लाल शेव, टोमॅटो, कांदे, हळद, लाल तिखट, धने पावडर , मोहरी, जिरे, मीठ, तेल, कोथिंबीर इ.
यासाठी प्रथम कढईत तेल गरम करून यात मोहरी आणि जिऱ्याची फोडणी द्या
मग यात चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून शिजवून घ्या
आता यात सर्व मसाले घाला आणि तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्या
मसाले शिजले की मग यात शेव आणि पाणी घालून वर झाकण ठेवा
काही मिनिटे भाजी शिजवळयांनंतर यावर चिरलेली कोथिंबीर घाला आणि गॅस बंद करा