कमी साहित्य, भन्नाट चव! अशी बनवा जिरा आलू भाजी

Life style

03 June 2026

Author:  नुपूर भगत

उकडलेल्या बटाट्यांची सालं काढून त्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.

बटाट्यांची साल काढा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. त्यामध्ये जिरे घालून तडतडू द्या.

कढईत तेल घाला

Picture Credit: Pinterest

जिरे तडतडल्यावर हिरवी मिरची घालून काही सेकंद परतून घ्या.

जिरे टाका

Picture Credit: Pinterest

आता हळद, लाल तिखट आणि धणे-जिरे पूड घालून हलकेच परता.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

त्यामध्ये बटाट्याचे तुकडे आणि मीठ घालून मसाला सर्व बटाट्यांना व्यवस्थित लागेल असे हलक्या हाताने मिसळा.

मीठ घाला

Picture Credit: Pinterest

मध्यम आचेवर 4-5 मिनिटे परता, जेणेकरून बटाट्यांना हलका सोनेरी रंग येईल आणि मसाल्याची चव मुरेल.

मध्यम आचेवर शिजवा

Picture Credit: Pinterest

गॅस बंद करून लिंबाचा रस आणि चिरलेली कोथिंबीर घाला. गरमागरम जिरा आलू पोळी, पराठा किंवा पुरीसोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest