रात्रीच्या जेवणाला बनवा पालक पनीर

Life style

03 September 2026

Author:  नुपूर भगत

पालकाची पाने निवडून स्वच्छ धुवा. गरम पाण्यात २ मिनिटे पालक ब्लांच करून लगेच थंड पाण्यात काढा.

पालक स्वच्छ करा

Picture Credit: Pinterest

ब्लांच केलेला पालक आणि हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला.

 पेस्ट तयार करा

Picture Credit: Pinterest

पनीरचे चौकोनी तुकडे करा. कढईत थोडे तेल गरम करून पनीरचे तुकडे हलके सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.

पनीर तयार करा

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करून जिरे घाला. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि आले-लसूण पेस्ट घालून कांदा मऊ होईपर्यंत परता.

मसाला परता

Picture Credit: Pinterest

टोमॅटोची प्युरी घालून त्यात हळद, लाल तिखट आणि मीठ घाला. मसाला तेल सोडेपर्यंत चांगला परतून घ्या.

टोमॅटो आणि मसाले घाला

Picture Credit: Pinterest

तयार केलेली पालकाची पेस्ट मसाल्यात घाला. थोडे पाणी घालून ५-७ मिनिटे मंद आचेवर शिजवा. 

पालकाची ग्रेव्ही शिजवा

Picture Credit: Pinterest

शेवटी पनीरचे तुकडे, गरम मसाला आणि फ्रेश क्रीम घालून २-३ मिनिटे शिजवा. गरमागरम पालक पनीर पोळी, किंवा भातासोबत सर्व्ह करा.

 पनीर आणि क्रीम घाला

Picture Credit: Pinterest