एक कप पांढरे वाटाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी कुकरमध्ये वाटाणे, हळद, मीठ, आवश्यकतेनुसार पाणी घालून ४ ते ५ शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्या.
Picture Credit: Pinterest
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि आले-लसूण पेस्ट घाला. त्यानंतर हळद, तिखट, धनेपूड आणि शिजवलेले वाटाणे घालून मिश्रण चांगले उकळू द्या.
Picture Credit: Pinterest
उकडलेले बटाटे सोलून मॅश करा. त्यात मीठ, लाल तिखट, थोडे कॉर्नफ्लोअर आणि कोथिंबीर घालून एकजीव करा. या मिश्रणाचे गोल गोळे करून हलके चपटे पॅटिस बनवा.
Picture Credit: Pinterest
तव्यावर थोडे तेल किंवा तूप घाला. त्यावर पॅटिस ठेवून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि बाहेरून कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
Picture Credit: Pinterest
हिरवी चटणी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या आणि लिंबाचा रस वाटून घ्या. चिंचेची गोड-आंबट चटणी आणि बारीक शेवही तयार ठेवा.
Picture Credit: Pinterest
एका प्लेटमध्ये गरमागरम पॅटिस ठेवा. त्यावर तयार रगडा घाला. त्यानंतर हिरवी चटणी, चिंचेची चटणी आणि चाट मसाला घाला.
Picture Credit: Pinterest
वरून बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, शेव आणि थोडे लिंबू पिळा. अशा प्रकारे तयार झालेले चटपटीत रगडा पॅटिस गरमागरम सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest