मशरूम स्वच्छ धुऊन त्यांचे देठ हलक्या हाताने काढून घ्या. आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी जागा तयार करा.
Picture Credit: Pinterest
एका बाऊलमध्ये उकडलेला बटाटा मॅश करून त्यात कांदा, हिरवी मिरची आणि किसलेले चीज घाला.
Picture Credit: Pinterest
आता मिश्रणात आलं-लसूण पेस्ट, मीठ, काळी मिरी पावडर आणि ओरेगॅनो घालून सर्व साहित्य एकजीव करा.
Picture Credit: Pinterest
तयार मिश्रण मशरूमच्या आत हलक्या हाताने भरून घ्या. वरून थोडे ब्रेडक्रम्ब्स पसरवा.
Picture Credit: Pinterest
पॅनमध्ये बटर गरम करून स्टफ्ड मशरूम सावकाश ठेवा आणि झाकण ठेवून मंद आचेवर शिजवा.
Picture Credit: Pinterest
मशरूम मऊ झाले आणि वरचा भाग हलका सोनेरी दिसू लागला की त्यावर थोडे चीज पसरवा.
Picture Credit: Pinterest
चीज वितळल्यानंतर गरमागरम स्टफ्ड मशरूम प्लेटमध्ये काढा आणि टोमॅटो सॉस किंवा मेयो डिपसोबत सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest