व्रतासाठी परफेक्ट ठरतात ही चवदार पदार्थ

Life style

28 June 2026

Author:  नुपूर भगत

 वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करताना चव आणि पोषणाचा समतोल राखणे महत्त्वाचे असते.

 उपवासाची सुरुवात पौष्टिकतेने

Picture Credit: Pinterest

 मोकळी, चविष्ट आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे पौष्टिक बनलेली साबुदाणा खिचडी हा उपवासातील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहे.

साबुदाणा खिचडी

Picture Credit: Pinterest

 राजगिऱ्याच्या पिठात उकडलेला बटाटा, शेंगदाणा कूट आणि हिरवी मिरची घालून तयार केलेले थालीपीठ पोटभर आणि पौष्टिक असते.

राजगिरा थालीपीठ

Picture Credit: Pinterest

 बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले साबुदाणा वडे दही किंवा हिरव्या उपवासाच्या चटणीसोबत अप्रतिम लागतात.

साबुदाणा वडा

Picture Credit: Pinterest

 उकडलेल्या रताळ्यापासून बनवलेली टिक्की हलकी, गोडसर आणि उपवासासाठी उत्तम पर्याय ठरते.

रताळ्याची टिक्की

Picture Credit: Pinterest

भगरसोबत शेंगदाणा आणि दह्याची चविष्ट आमटी हा उपवासातील पौष्टिक, हलका आणि पोटभर पर्याय आहे.

भगर आणि आमटी

Picture Credit: Pinterest

 दूध, मखाने, सुकामेवा आणि वेलचीच्या सुगंधाने तयार केलेली मखाना खीर वटपौर्णिमेच्या उपवासाचा गोड शेवट करण्यासाठी उत्तम पर्याय ठरते.

मखाना खीर

Picture Credit: Pinterest