Published August 17, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
सगळ्यात आधी 2 वाट्या ज्वारीच्या लाह्या आणि पोहे घ्या.
पोहे पाण्यात भिजवून, त्याचे पाणी काढून टाका
.
भिजलेल्या पोह्यांमध्ये थोडसं मीठ आणि साखर घालून मिक्स करा.
नंतर दह्यामध्ये तुमच्या आवडीनुसार साखर आणि चवीपुरतं मीठ घाला, मिक्स करा
नंतर साजूक तुपात मिरची, कढीपत्ता आणि हिंग घालून फोडणी करा.
ही फोडणी दह्यामध्ये मिक्स करा आणि ढवळून ठेवा
एका परतीत लाह्या, काकडी, पोहे, मिक्स करून घ्या.
या मिश्रणात फोडणी दिलेलं दही घाला, आणि मिक्स करा, गोपाळकाला तयार