Published Oct 31, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/Instagram
51 व्या वर्षीही दिसाल तरूण, मलायकाने शेअर केला सिक्रेट ज्युस
मलायका अरोराच्या तारूण्याचे नक्की रहस्य काय असा प्रश्न अनेकांना पडतो. मलायकाने स्वतः खुलासा केलाय
मलायकची स्किन वयाच्या 51 व्या वर्षीही इतकी चमकदार कशी असा जर प्रश्न तुम्हाला सतावत असेल तर जाणून घ्या
मलायकाने आपल्या सिक्रेट ज्युसबाबत सांगितले असून तिच्या चाहत्यांना नक्कीच हा उपाय करता येईल
.
मलायका अजूनही एखाद्या तिशीच्या मुलीइतकी दिसते आणि याचे रहस्य म्हणजे ती सकाळी उठल्यावर आवळ्याचा ज्युस पिते
.
मलायकाप्रमाणे हा आवळ्याचा ज्युस बनविण्यासाठी 1 आवळा, अर्धा चमचा आलं, कच्चा हळदीचा तुकडा आणि 4-5 काळी मिरी
सर्वात पहिले आलं, आवळा, कच्ची हळद धुवा. त्यानंतर तुकडे करून मिक्सरमधून वाटून घ्या
हे मिश्रण काढल्यावर गाळा आणि हा ज्युस सकाळी रिकाम्या पोटी तुम्ही प्यावा जो त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे
या आवळ्याच्या ज्युसमुळे त्वचा अधिक उजळ होते आणि याशिवाय तुम्ही अधिक काळ तरूण दिसता
चेहऱ्यावर अधिक चमक येण्यासाठी आणि डाग दूर करण्यासाठीही तुम्ही या आवळ्याच्या ज्युसचा वापर करावा
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही