Maruti Suzuki च्या गाड्या घेण्याची हीच योग्य वेळ?

Automobile

28 May, 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

स्वस्त कारसाठी ओळखल्या जाणाऱ्या Maruti सुझुकीने मोठा निर्णय घेतला आहे.

Maruti Suzuki चा निर्णय

Img Source: Pinterest 

Maruti Suzuki ची गाडी घेण्याचा विचार करत असाल तर हीच योग्य वेळ आहे. 

हीच योग्य वेळ

तुम्ही Maruti Suzuki ची गाडी ४ दिवसांनी घ्यायला गेलात तर तुमच्या खिशाला फटका बसेल.

४ दिवसांनी बसेल फटका

१ जूनपासून महाग

Maruti Suzuki ची कार घेण्याचा विचार करत असाल तर आताच घ्या. १ जूनपासून किंमती वाढणार आहेत.

४ दिवसांची वेळ

तुम्ही १ जूनच्या आधी कार खरेदी केली तर तुम्हाला त्यासाठी सध्याची एक्स शोरुम किंमत मोजावी लागेल.

हे लक्षात ठेवा

कंपनीने प्रत्येक मॉडेलसाठी नेमकी दरवाढ किती असेल हे स्पष्ट केलेले नाही. मात्र, ३०,००० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.

किंमत का वाढवली?

भाववाढीचे कारण म्हणजे वाढणारा उत्पादन खर्च. कच्च्या मालाची किंमत वाढत आहे.

कंपनीवर परिणाम

पोलाद, aluminium, तांबे आणि प्लास्टिक यांसारख्या औद्योगित सामग्रीचा वापर उत्पादनामध्ये केला जातो. त्यांच्या किंमतीत फरकाचा उत्पादन करणाऱ्या कंपनीवर परिणाम होतो.

महागाईमुळे उत्पादनांच्या किंमतीत वाढ

कंपन्या अनेकदा वाढत्या कच्च्या मालाच्या किंमतीचा काही भार स्वत: उचलतात. परंतु, दीर्घकालीन महागाईमुळे उत्पादनांच्या किंमत वाढतात.

इतर कंपन्यांनीही केली दरवाढ

मारुती सुझुकी व्यतिरिक्त होंडाईसह भारतीय बाजारातील इतर कंपन्यांनीही त्यांच्या गाड्यांच्या दरात वाढ जाहीर केली.