www.navarashtra.com

Published Jan 23,  2025

By  Prajakta Pradhan

मौनी अमावस्येला तुळशीला या वस्तू अर्पण करा, भरुन जाईल संपत्तीचे भांडार

Pic Credit -  pinterest

सनातन धर्मात मौनी अमावस्येला विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे शुभ आहे. 

मौनी अमावस्या 

पंचागानुसार, यावर्षी मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी आहे. या दिवशी पूजा केल्याने भक्ताच्या जीवनात सुख-समृद्धी येते.

मौनी अमावस्या कधी

पंचागानुसार अमावस्या तिथीची सुरुवात 28 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.35 वाजता होईल आणि त्याची समाप्ती 29 जानेवारीला संध्याकाळी 6.5 वाजता होईल.

शुभ मुहूर्त

मौनी अमावस्येला तुळशीच्या रोपाची पूजा करणे शुभ मानले जाते. असे केल्याने साधकाच्या जीवनात पैशाची कमतरता भासत नाही

तुळशीच्या रोपाची पूजा

मौनी अमावस्येला पूजा करताना तूळशीच्या रोपाला श्रृंगाराचे सामान अर्पण करावे. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुंटुबात सुख समृद्धी नांदते.  

श्रृंगाराचे सामान

तुळशीच्या रोपाची पूजा करताना लाल कलवा बांधा. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि आर्थिक लाभ होतो.

लाल कलवा बांधा

मौनी अमावस्येला तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करा. असे केल्याने अशुभ दूर होऊन जीवनात सुख-शांती राहते.

कच्चे दूध द्या

मौनी अमावस्येला संध्याकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावा. यामुळे घरात सकारात्मकता राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो.

दिवा लावा