Published Nov 08, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
पोटाची चरबी विरघळेल 1 महिन्यात, मेथीच्या दाण्याचा करा वापर
मेथी दाणे शरीराच्या अनेक भागांसाठी उपयोगी ठरतात. वजन कमी करण्यासाठी मेथी दाण्याचा कसा वापर करावा जाणून घ्या
आजकाल खाण्याच्या चुकीच्या सवयी, जगण्याची पद्धत यामुळे अनेकांच्या पोटावर चरबी वाढून लठ्ठपणा येताना जाणवतोय
तुम्हालाही सतत बसून काम, चुकीचे खाणे यामुळे पोटातील चरबी वाढण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असेल तर घरगुती उपाय करायला हवा
.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचा उपयोग करणे हा उत्तम घरगुती उपाय ठरू शकतो
.
मेथी दाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, फोलेट, फॉस्फोरस, मॅग्नेशियम आणि विटामिन ए गुण आढळतात, जे वजन कमी करण्यास मदत करतात
मेथी दाण्यातील गॅलेक्टोमॅनन हा घटक फॅट सेल्स त्वरीत वेगाने जाळण्यास मदत करतो आणि यामुळे पोटाची साठलेली चरबी कमी होते
मेथी दाणे शरीरातील मेटाबॉलिज्म त्वरीत वाढवतो आणि त्यामुळे त्वरीत वजन कमी करण्यास मदत मिळते
मेथीमधील फायबर हे तुमचे वजन झर्रकन कमी करते. सकाळी उठल्यावर उपाशीपोटी मेथी दाण्याच्या पाण्याचे सेवन करणे उत्तम ठरते
रात्रभर एक ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवा. सकाळी हे पाणी उकळवा आणि गाळून प्या. बेली फॅट लवकर कमी होईल
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही