पावसात भिजायला सर्वांनाच आवडतं.
Picture Credit: Pinterest
मात्र या पावसात त्वचेवर याचा गंभीर परिणाम होतो.
पावसात चिखलामुळे त्वचेवर अॅलर्जी होते.
खाज येणं किंवा त्वचा अतिसंवेदनशील होणं पायांना जखमा होणं असा त्रास होतो.
पावसात चिखलाचा थेट संबंध पायांशी येतो, त्यामुळे जळजळ किंवा लाल पुरळ येणं हा त्रास होतो.
ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असते, त्यांना पावसाळ्यात त्वचा विकाराचा त्रास जास्त जाणवतो.
बाहेर असताना पावसामुळे ओले कपडे अंगावर खूप वेळ राहतात. त्यामुळे त्वचाविकार होण्याची शक्यता जास्त असते.
यावर उपाय म्हणजे बाहेरुन घरी आल्यावर गरम पाण्याने अंघोळ करा.
गरम पाण्यात नीलगिरी कापूर तेलाचे काही थेंब टाका.
त्यानंतर त्वचेला मॉइस्चरायजर लावायला विसरु नये.
तसंच पावसात भिजल्यामुळे केसात कोंडा होण्याचं प्रमाण देखील वाढतं.
त्यामुळे आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुवा.