संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट पर्याय, कुरकुरीत कॉर्न भजी

Life style

15 June 2026

Author:  नुपूर भगत

मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घ्या. त्यातील अर्धे दाणे हलकेसे जाडसर वाटून घ्या आणि उरलेले दाणे तसेच ठेवा.

मक्याचे दाणे

Picture Credit: Pinterest

एका मोठ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, हळद, लाल तिखट, हिंग आणि मीठ एकत्र मिसळा.

साहित्य मिसळा

Picture Credit: Pinterest

त्यात वाटलेले आणि अख्खे मक्याचे दाणे, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घाला.

पेस्ट करा

Picture Credit: Pinterest

मिश्रण एकत्र करताना पाणी लागणार नाही, फारच घट्ट असल्याचं चमचाभर पाण्याचा वापर करा.

पाणी नको 

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. तेल पुरेसे गरम झाल्यावर मिश्रणाचे छोटे-छोटे गोळे किंवा चमच्याने भाग तेलात सोडा.

तेलात भाजी टाका

Picture Credit: Pinterest

भजी मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. नंतर टिश्यू पेपरवर काढा.

भजी तळा 

Picture Credit: Pinterest

गरमागरम कॉर्न भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest