लूक पाहून म्हणाल SUV पण, आहे i20 आता अधिक लांब, अधिक प्रिमियम आणि नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज.
Img Source: Pinterest
ब्राझीलमध्ये लाँच झालेल्या नवीन फेसलिफ्टेड i20 ची लांबी ४.१ मीटर आहे.
ब्राझीलमध्ये त्याची सुरुवातीची किंमत ९९,९९० ब्राझिलियन रियाल आहे, जी भारतीय चलनात १८.८ लाख आहे.
भारतात लाँचच्या वेळी या कारची किंमत चलन रुपांतरणानंतर होणाऱ्या किमती इतकी नसेल.
नवीन i20 ही Hyundaiच्या K3 प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आली आहे. ज्यावर सध्याची किया सेल्टोस आधारित आहे.
ड्युअल-टोन अलॉय व्हील्समुळे साईड प्रोफाइलला स्पोर्टी लूक मिळतो, तर ब्लॅक क्लॅडिंगमुळे गाडीला SUV सारखी फील येतो.
कंपनी निवडक भागांसाठी, ज्यामध्ये क्लच आणि ब्रेकशी संबंधित भागांचा समावेश आहे, ऐच्छिक झीज विमा संरक्षण देखील देत आहे.
कॅबिनमध्ये १२.३ इंचाचा कव्हर्ड ड्युअल - स्क्रीन सेटअप, नवीन लोगो-लेस स्टीयरिंग व्हील, वायरलेस चार्जिंग पॅड आणि ड्युअल टोन लेदर अलहोल्स्ट्री आहे.
सीट्सवर वैशिष्ट्यपूर्ण i20 ब्रँडिंग आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे ADAS सुरक्षा प्रणालीचा समावेश आहे. यामुळे ड्रायव्हिंग सुरक्षित होते.
नवीन Hyundai i20 मध्ये ३४६ लिटरच्या बूट स्पेससह सुधारित स्टोरेज आणि स्पेस देखील मिळते.
नवीन i20 दोन इंजिन पर्यायांसह येते. पहिला म्हणजे १.० लिटर MPi नॅचरली ऍस्पिरेटेड फ्लेक्स-फ्यूएल इंजिन, जे ७९ bhp पॉवर आणि १०० Nm टॉर्क निर्माण करते.
दुसरा पर्याय १.० लिटर टीजीडीआय टर्बो फ्लेक्स-फ्यूएल इंजिन आहे, जे ११३.४ बीएचपी शक्ती आणि १७१.५ एनएम टॉर्क निर्माण करते.
३० टक्के इथेनॉल मिश्रित इंधन असलेल्या E30 पेट्रोलवर ही दोन्ही इंजिने सुरळीतपणे चालू शकतात.
नवीन Hyundai i20 भारतात येण्याची दाट शक्यता आहे, मात्र कंपनी भारतीय बाजारपेठेसाठी काही बदल करु शकते.