ओरिओ बिस्कीटापासून घरीच तयार करा केक

Life style

08  May 2026

Author:  नुपूर भगत

ओरिओ बिस्कीटचे क्रीमसह छोटे तुकडे करून मिक्सरमध्ये घाला आणि त्याची बारीक पावडर तयार करा.

ओरिओ बिस्कीटची पावडर

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात ही बिस्कीट पावडर काढा. त्यात कोको पावडर आणि साखर घालून मिक्स करा.

कोको पावडर

Picture Credit: Pinterest

आता थोडं-थोडं दूध घालत स्मूद बॅटर तयार करा. बॅटर फार पातळ किंवा फार घट्ट ठेवू नका.

दूध घाला

Picture Credit: Pinterest

शेवटी बेकिंग पावडर घालून हलक्या हाताने मिश्रण एकत्र करा.

बेकिंग पावडर

Picture Credit: Pinterest

केक बनवायच्या भांड्याला बटर लावा आणि त्यात तयार बॅटर ओता. वरून चॉकलेट चिप्स घाला.

चॉकलेट चिप्स

Picture Credit: Pinterest

प्रिहीट केलेल्या ओव्हनमध्ये १८०°C वर २०-२५ मिनिटे बेक करा. ओव्हन नसेल तर कढईतही हा केक बनवू शकता.

केक बेक करा

Picture Credit: Pinterest

केक थंड झाल्यावर त्यावर चॉकलेट सिरप घाला आणि तुकडे करून सर्व्ह करा

चॉकलेट सिरप

Picture Credit: Pinterest