Published July 26, 2024
By Shubhangi Mere
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहे. त्यामुळे तिच्याकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.
२५ जुलै रोजी झालेल्या तिरंदाजी रँकिंग राउंडमध्ये भारताच्या धीरज बोम्मादेवरा वैयक्तिक स्पर्धामध्ये चौथे स्थान गाठले आहे.
.
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने टोकियोमध्ये सुवर्ण जिंकले होते. त्यामुळे यंदा त्याच्याकडून भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे.
भारताची स्टार बॅडमिंटनपटू मीराबाई चानू हिच्याकडून टोकियोमध्ये सुवर्ण हुकले होते त्यामुळे ती यंदा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करेल.
वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन पहिल्यांदाच ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहे, त्यामुळे यंदा भारतीयांच्या नजरा निखतवर असणार आहेत.
भारताची स्टार गोल्फर अदिती अशोककडून यावेळी पदक जिंकण्याची अपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अदितीचे सुवर्णपदक हुकले होते.
जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या नंबरला असणारे सात्विक आणि चिराग यांच्याकडून भारतीयांना मोठ्या अपेक्षा आहेत.
लोव्हलीना टोकियोमध्ये सर्वांनाच चकित केले होते, यंदा ती रिंगमध्ये सुवर्ण पदकासाठी प्रयत्न करेल.