कुरकुरीत आणि चटपटीत फ्लॉवरचे मंचूरियन 

Life style

28  January 2026

Author:  नुपूर भगत

फ्लॉवरचे तुकडे गरम पाण्यात थोडे मीठ घालून 5 मिनिटे उकळून घ्या. पाणी निथळून ठेवा.

फ्लॉवर उकळून घ्या

Picture Credit: Pinterest

एका भांड्यात मैदा, कॉर्नफ्लोअर, मीठ, मिरी आणि थोडे पाणी घालून घट्टसर पीठ तयार करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

फ्लॉवरचे तुकडे या पिठात बुडवून गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

फ्लॉवरचे तुकडे तळा 

Picture Credit: Pinterest

एका कढईत 1 टेबलस्पून तेल घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट परतून घ्या.

आलं-लसूण पेस्ट

Picture Credit: Pinterest

आता त्यात सोया सॉस, चिली सॉस आणि टोमॅटो सॉस घालून 1–2 मिनिटे परता.

सॉसेस घाला

Picture Credit: Pinterest

तळलेले फ्लॉवर मंचुरियन कढईत घालून सॉससोबत नीट टॉस करा.

टॉस करा

Picture Credit: Pinterest

हिरवी कांदी घालून गॅस बंद करा. गरमागरम फ्लॉवर मंचूरियन खाण्यासाठी सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest