चहा टाइमसाठी परफेक्ट स्नॅक: सोपी आणि कुरकुरीत आलू टिक्की

Life style

24 January 2026

Author:  नुपूर भगत

उकडलेले बटाटे सोलून एका भांड्यात नीट मॅश करा. गाठी राहू देऊ नका.

बटाटे मॅश करा

Picture Credit: Pinterest

त्यात हिरवी मिरची, आले, मीठ आणि सर्व मसाले घालून चांगले मिसळा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

आता कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचे पीठ घालून मिश्रण घट्ट करा.

कॉर्नफ्लोअर घाला 

Picture Credit: Pinterest

मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून त्यांना चपट्या टिक्कीसारखा आकार द्या.

टिक्कीचा आकार द्या

Picture Credit: Pinterest

दुसरीकडे कढई किंवा तव्यावर थोडे तेल गरम करा.

तेल गरम करा

Picture Credit: Pinterest

तयार टिक्की मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.

टिक्की तळा 

Picture Credit: Pinterest

तयार आलू टिक्की काढून गरमागरम हिरवी चटणी, चिंचेची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest