चिकन स्वच्छ धुवून त्यात दही, हळद आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. हे मिश्रण किमान 30 मिनिटे मुरण्यासाठी ठेवा.
Picture Credit: Pinterest
कढईत सुक्या लाल मिरच्या, धणे, जिरे आणि मिरे मंद आचेवर भाजून घ्या. मसाल्यांचा सुगंध येऊ लागल्यावर गॅस बंद करा.
Picture Credit: Pinterest
भाजलेले मसाले, लसूण आणि चिंच एकत्र करून थोडे पाणी घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा.
Picture Credit: Pinterest
मुरवलेल्या चिकनमध्ये तयार मसाला पेस्ट घालून पुन्हा 15 मिनिटे मुरू द्या, त्यामुळे मसाल्याची चव चिकनमध्ये छान मुरते.
Picture Credit: Pinterest
कढईत 2 टेबलस्पून तूप गरम करून त्यात चिकन घाला. मध्यम आचेवर चिकन अर्धवट शिजेपर्यंत परता.
Picture Credit: Pinterest
उरलेले तूप आणि कढीपत्ता घालून चिकन पूर्णपणे शिजवा. मसाला घट्ट होईपर्यंत आणि तूप सुटेपर्यंत सतत ढवळत राहा.
Picture Credit: Pinterest
चिकनला सुंदर लालसर रंग आला आणि मसाला चिकनला व्यवस्थित कोट झाला की गॅस बंद करा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
Picture Credit: Pinterest