फिश पकोडा एक परफेक्ट स्टार्टर डिश आहे 

Life style

03 March 2026

Author:  नुपूर भगत

एका भांड्यात मासे घेऊन त्यात मीठ, हळद आणि लिंबाचा रस घालून १०–१५ मिनिटे मुरत ठेवा.

मॅरीनेट करा

Picture Credit: Pinterest

दुसऱ्या भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि आलं-लसूण पेस्ट एकत्र करा.

मसाले घाला

Picture Credit: Pinterest

त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्टसर आणि गाठी नसलेले पीठ तयार करा.

पीठ तयार करा

Picture Credit: Pinterest

मुरवलेले माशांचे तुकडे या पिठात घालून चांगले कोट करून घ्या.

माशाचे तुकडे घाला

Picture Credit: Pinterest

कढईत तेल गरम करा. तेल चांगले तापल्यावर माशांचे तुकडे एकेक करून मध्यम आचेवर सोडा.

फ्राय करा

Picture Credit: Pinterest

पकोडे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. किचन टिश्यूवर काढून गरमागरम चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

सर्व्ह करा

Picture Credit: Pinterest