Published Nov 5, 2024
By Narayan Parab
Pic Credit - Social Media
मी पुन्हा येईन ? देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकीर्द
देवेंद्र फडणवीस हे महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.
1992 साली वयाच्या 22 व्या वर्षी ते पहिल्यांदा नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले.
देवेंद्र फडणवीस हे 1997 साली वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी नागपूरचे महापौर झाले. देशातील सर्वात कमी वयाच्या महापौरांपैकी ते एक होते.
1999 पासून ते नागपूरमधून पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर आजतागायत हा प्रवास सुरु आहे.
2013 मध्ये फडणवीस हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यात 2014 मध्ये भाजपला जबरदस्त यश मिळाले. पक्षाचे 122 आमदार निवडून आले.
2014 मध्ये देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यंमत्री झाले. राज्यात पहिल्यांदाच भाजपचा मुख्यमंत्री झाला होता.
2019 मध्ये केवळ 80 तासांकरिता ते मुख्यमंत्री झाले. ते सर्वात कमी वेळासाठी मुख्यंमत्री होते.
.
2022 मध्ये महायुतीच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री झाले.
.
भाजप 2024 ची विधानसभा निवडणूक ही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीन लढत आहे.
.
महायुतीचे सरकार आल्यास देवेंद्र फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात.
.