Published Nov 13, 2024
By Prajakta Pradhan
Pic Credit - iStock
प्रदोष व्रताच्या दिवशी या मंत्रांचा जप करा, कामात मिळेल यश
हिंदू धर्मात प्रदोष व्रताच्या दिवशी पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे. असे केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात.
पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत 13 नोव्हेंबर रोजी आहे. यावेळी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते.
कार्तिक महिन्याच्या त्रयोदशी तिथीची सुरुवात 13 नोव्हेंबर दुपारी 1.13 मिनिटांनी होईल त्याची समाप्ती 14 नोव्हेंबरला सकाळी 9.43 मिनिटांनी होईल.
.
प्रदोष व्रताच्या वेळी मंत्रांचा जप करणे शुभ मानले जाते. असे केल्याने व्यक्तीच्या आयुष्यात प्रगती होते आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते.
.
प्रदोष व्रताची पूजा करताना ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. यामुळे साधकाच्या मनोकामना पूर्ण होऊ लागतात आणि मनही शांत राहते.
प्रदोष व्रताच्या वेळी ओम गौरीशंकरार्धनाथी नमः मंत्राचा करण्याने वैवाहिक जीवनात गोडवा येतो. याशिवाय लग्नाची शक्यता असते.
भगवान शंकराची पूजा करताना ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रः प्रचोद्यात या मंत्राचा जप केल्याने यश मिळते.
प्रदोष व्रतात या मंत्रांचा जप केल्याने साधकाची आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय व्यवसायातील अडथळे दूर होऊ लागतात.