By Nupur Bhagat
Published Nov 24, 2024
समोसा हे सर्वांचे आवडते स्ट्रीट फूड आहे. तुम्ही घरीदेखील हा पदार्थ काही मिनिटांतच तयार करु शकता
यासाठी प्रथम मैद्यात हलके मीठ आणि ओवा घालून घट्ट पीठ मळून घ्या
स्टफींगसाठी बटाटे उकडून, सोलुन, मॅश करुन घ्या
आता एका कढईत तेल टाकून यात आलं-लसूण पेस्ट, मिरची पेस्ट, मटार टाका आणि परतून घ्या तयार केला जातो
मग यात मीठ, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि मॅश केलेले बटाटे टाका आणि साहित्य परता आणि गॅस बंद करा
यानंतर तयार पीठाच्या पुऱ्या लाटून घ्या आणि मधून कापून यांचे दोन तुकडे करा
आता एक तुकडा घ्या, याचा कोन बनवा आणि यात तयार स्टफींग भरुन समोसा तयार करा
आता गरम तेलात हे समोसे मंद आचेवर छान तळून घ्या
तयार सामोसे सॉस किंवा चटणीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा