लाल, हिरवे, काळे कोणती द्राक्षे आहेत अधिक फायदेशीर?

Written By: Nupur Bhagat

Source: Pinterest

बाजारात लाल, हिरवे, काळे तीन प्रकारचे द्राक्ष उपलब्ध असतात

द्राक्षे

अशात कोणते द्राक्ष खरेदी करावे असा प्रश्न पडतो. चला याचे अचूक उत्तर जाणून घेऊया

कोणती द्राक्षे फायदेशीर

तसं पाहिलं तर प्रत्येक द्राक्ष आरोग्यासाठी फायदेशीर आहे पण प्रत्येकाचे फायदे वेगळे आहेत

फायदे

लाल द्राक्षांमध्ये फायबर अधिक प्रमाणात असते. हे पचन सुधारते, ब्लड शुगर संतुलित करते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते

लाल द्राक्षे

हिरव्या द्राक्षात कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि त्वचेसाठीही फायदेशीर ठरते

हिरवी द्राक्षे

काळे द्राक्ष त्वचेला दीर्घकाळ तरुण ठेवतात. यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारते. यातील अँटीऑक्सिडंट्स हृदय आणि मेंदूसाठी लाभदायक ठरतात

काळी द्राक्षे

प्रत्येक द्राक्षात विविध गुणधर्म आहेत, त्यामुळे कोणत्याही एका प्रकारावर अवलंबून राहण्याऐवजी विविध प्रकारच्या द्राक्षांचा आहारात समावेश करावा

आहारात समावेश करा