आध्यात्मिक शांतीचा अनुभव देणारी भारतातील पवित्र स्थळे

Life style

17 January 2026

Author:  नुपूर भगत

गंगेच्या काठी वसलेले वाराणसी हे सर्वात प्राचीन शहरांपैकी एक आहे. गंगा आरती आणि काशी विश्वनाथ मंदिराची दर्शनं मनाला अलौकिक शांतता देतात.

वाराणसी, उत्तर प्रदेश

Picture Credit: Pinterest

‘योगाची राजधानी’ म्हणून ओळखले जाणारे ऋषिकेश अध्यात्मासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. लक्ष्मण झुला, राम झुला, गंगे काठी ध्यान केल्याने अंतर्मन शुद्ध होते.

 ऋषिकेश, उत्तराखंड

Picture Credit: Pinterest

भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली ही भूमी बौद्ध धर्मीयांसाठी पवित्र आहे. महाबोधी मंदिर आणि बोधी वृक्षाजवळ ध्यान केल्यास शांततेचा अनुभव येतो.

बोधगया, बिहार

Picture Credit: Pinterest

सुवर्ण मंदिर हे शीख धर्माचे प्रमुख तीर्थस्थान आहे. लंगर सेवा, कीर्तन आणि पवित्र सरोवराभोवतीची शांतता मन प्रसन्न करते.

अमृतसर, पंजाब

Picture Credit: Pinterest

अरुणाचल पर्वताच्या पायथ्याशी वसलेले हे ठिकाण भगवान शिवाशी संबंधित आहे. गिरिवलम केल्याने आत्मिक शांती लाभते, अशी श्रद्धा आहे.

तिरुवण्णामलई, तामिळनाडू

Picture Credit: Pinterest

साईबाबांचे शिर्डी हे श्रद्धा, सबुरी आणि सबका मालिक एक या संदेशासाठी प्रसिद्ध आहे. समाधी मंदिरात केलेले  ध्यान अंतर्मनाला शांत करते.

 शिर्डी, महाराष्ट्र

Picture Credit: Pinterest

हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ धाम हे शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र आहे. निसर्गसौंदर्य आणि भक्तिभाव यांचा संगम येथे अनुभवता येतो.

केदारनाथ, उत्तराखंड

Picture Credit: Pinterest