Written By: Prajakta Pradhan
Source: Pinterest
सनातन धर्मात संकष्टी चतुर्थीला गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी कोणते काम केले तर गणपतीचा आशीर्वाद मिळतो. ते जाणून घेऊया
पंचांगानुसार विकट संकष्टी चतुर्थी आज १६ एप्रिल रोजी आहे. या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते.
पंचांगानुसार संकष्टी चतुर्थीची सुरुवात १६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजून १६ मिनिटांनी होईल आणि त्याची समाप्ती १७ एप्रिलला ३.२३ ला होईल
काही काम अशी असतात जी संकष्टी चतुर्थीला करणे शुभ मानले जाते. यामुळे व्यक्तीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.
संकष्टी चतुर्थीला आंघोळ झाल्यानंतर पूजा करतेवेळी गणपतीला फूल, फळ, रोळी आणि तांदूळ यासोबत २१ दुर्वा अर्पण करा.
संकष्टी चतुर्थीला गणपतीला तिळकुटचा नैवेद्य दाखवणे शुभ मानले जाते. याशिवाय मोदकाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. यामुळे व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी येते.
विकट संकष्टी चतुर्थीची पूजा करताना कंदताय विम्ह्ये, वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोद्यात किंवा ओम गं गणपतये सर्व कार्य सिद्धी कुरू कुरू स्वाहा या मंत्रांचा जप करावा.
संकष्टी चतुर्थीला या गोष्टी केल्याने व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली होते. यासोबतच कार्यामध्ये यश मिळते.