Published On 12 March 2025 By Mayur Navle
Pic Credit - iStock
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानला आज कोणत्याही स्पेशल ओळखीची गरज नाही.
किंग खानने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणारा किंग खान त्याच्या हटक्या फॅशनमुळे चर्चेत आला आहे.
अभिनेत्याचे सध्या सोशल मीडियावर ‘आयफा अवॉर्ड २०२५’ सोहळ्यातील लूकचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
किंग खानच्या कॅज्युअल लूकने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले असून सध्या त्याच्या फॅशनचे चाहते जोरदार कौतुक करीत आहेत.
ब्लॅक कोट, टी-शर्ट आणि पँट वेअर करत अभिनेत्याने कॅमेऱ्यासमोर जबरदस्त फोटो पोजेस दिल्या आहेत.
फार क्वचित सोशल मीडियावर शाहरुख आपले स्टायलिश फोटोज शेअर करत असतो.
किंग खानच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.