By Nupur Bhagat
Published 19 Feb 2025 Pic Credit - Pinterest
19 फेब्रुवारीला शिवजयंती सर्वत्र मोठ्या थाटामाटात साजरी केली जात आहे
या दिनानिमित्त आज आम्ही महाराजांच्या काळातील एका खास पारंपरिक पदार्थाची रेसिपी घेऊन आलो आहोत
हा पदार्थ चवीला गोड आणि मऊसूत लागतो. याची रेसिपी फार सोपी आहे
गव्हाचे पीठ, मीठ, तूप, गूळ, पाणी, वेलची पूड, जायफळ इ.
प्रथम गव्हाच्या पिठात एक चमचे तूप घालून कणिक मळून घ्या
कढईत पाणी गरम करा आणि त्यात गुळाचे खडे टाकून मिक्स करा
मग यावर चमचाभर तूप, वेलची पावडर आणि जायफळ घालून मिक्स करा
शेवटी यात भाजलेला रवा घाला आणि शिऱ्याप्रमाणे छान शिजवून घ्या
हे मिश्रण थंड करा आणि मग याचे गोळे तयार करून कणिकाच्या गोळ्यात भरा
पुरणपोळीप्रमाणे याची पोळी लाटा आणि गरम तव्यावर ही पोळी तूप लावून छान खरपूस भाजून घ्या