Published Nov 09, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्याने काय होते नुकसान
तुम्ही आंघोळीसाठी जास्त गरम पाणी वापरत असाल तर वेळीच व्हा सावध! सतत जास्त गरम पाण्याने आंघोळ करणं ठरू शकतं नुकसनदायी
जास्त गरम पाणी वापरल्यास त्वचा कोरडी होते कारण गरम पाणी नैसर्गिक त्वचेतील मुलायमपणा शोषून घेते
अधिक गरम पाणी वापरल्यास त्वचेवर खाज येऊ लागते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल संपते आणि त्यामुळे अनेक त्रास होतात
.
जास्त गरम पाण्याचा वापर केल्यास पोर्स ओपन होतात आणि त्यात अधिक घाण जमू लागते, ज्यामुळे शरीरावर अॅक्ने अथवा पुरळ येतात
.
थंडीमध्ये लोक जास्त गरम पाण्याचा वापर सहसा करतात. पण तुम्ही जास्त वेळ आंघोळ करू नका यामुळे नुकसान पोहचू शकते
गरम पाण्याने आंघोळ केल्यास संपूर्ण शरीरावर व्यवस्थित मॉईस्चराईजर लावा यामुळे त्वचा कोरडी राहत नाही आणि खाजही येत नाही
गरम पाण्याने आंघोळ करायची असेल तर त्याआधी शरीराला तेलाने मालिश करून घ्या यामुळे नुकसान होणार नाही
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही