www.navarashtra.com

Published Feb 13, 2025

By Dipali Naphade

कच्चे आलं खाल्ल्याचा आरोग्यावर परिणाम

Pic Credit -   iStock

कच्चे आलं अधिक खाल्लं तर शरीरावर नकारात्मक परिणाम होताना दिसून येतो. पोटात जळजळ, अपचन, गॅस निर्माण होतो

आलं

कच्चे आलं हे उष्ण असून जास्त सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे, पोटातून पेटके येण्यासारख्या समस्या उद्भवतात

नुकसान

ज्या व्यक्तींना सतत छातीत जळजळ अथवा अ‍ॅसिड रिफ्लेक्स होत असेल त्यांनी कच्चे आलं खाणं त्रासदायक ठरू शकते

जळजळ

कच्चे आलं जास्त खाल्ल्याने पचनक्रिया वेगाने वाढते आणि त्यामुळे मलत्याग असामान्य स्वरूपात होऊन शरीरात कमकुवतपणा जाणवतो

जंताची समस्या

काही लोकांना कच्च्या आल्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर लाल डाग, रॅश, खाज समस्या येऊ शकतात

सूज वा रॅश

गरोदरपणात महिलांनी कच्चे आले अजिबात खाऊ नये. याच्या उष्णतेने उलटी वा मळमळ त्रास होऊ शकतो

गरोदर

पित्ताशयात ज्यांना खडा झालाय अशा व्यक्तींनी कच्च्या आल्यापासून दूर रहावे. अन्यथा पोटदुखीचा त्रास उद्भवतो

पित्त

कच्चे आले जास्त खाल्ल्यास कोरडेपणाची समस्या निर्माण होते, यात डोळे सुकणे, लालसरपणा, असुविधा निर्माण होणे याचा समावेश होतो

कोरडेपणा

आले नेहमी शिजवून खावे, काढा, सूप, सुकी पावडर या स्वरूपात त्याचा उपयोग करून घ्यावा

आल्याचे सेवन

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप