Published Dec 01, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
जास्त चपाती खाल्ल्याने होतील ‘हे’ आजार
गव्हाच्या चपातीमध्ये सॉल्युबल फायबर, कार्बोहायड्रेट, विटामिन, आयोडिन, जिंक, मँगनीज, कॉपर आणि पोटॅशियमसारखी तत्व आहेत
चपाती ही आरोग्यासाठी चांगली असली तरीही रोज किती खावी याचेही प्रमाण आहे, याबाबत आपण अधिक माहिती घेऊ
जास्त चपाती खाल्ल्यास नक्की काय नुकसान होते आणि कोणत्या गंभीर आजारांना सामोरं जावं लागू शकतं हे जाणून घेऊया
.
हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते, चपाती पचवणं सोपं नाही. त्यामुळे अधिक चपाती खाल्ल्याने तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते
.
जास्त चपाती खाल्ल्याने तुम्हाला आळस आणि सतत थकवा येऊ शकतो कारण यातील कार्बोहायड्रेट त्रासदायक ठरतात
तुम्ही जर प्रमाणापेक्षा अधिक चपाती खात असाल तर ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते कारण यातील कार्ब्सचा त्रास होतो
चपातीमध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे वजन पटकन वाढते आणि त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होतो
दीर्घकाळ चांगल्या आरोग्यासाठी संपूर्ण दिवसात तुम्ही केवळ 5-6 चपातीचे सेवन करू शकता. यापेक्षा अधिक चपाती नुकसानदायी आहे
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही