जास्त परफ्यूम लावणे ठरू शकते नुकसानदायक !

Written By: Mayur Navle

Source: iStock

आपण सर्वच जण परफ्यूम लावत असतो. यातही काही जण वेगवगेळ्या परफ्यूमचे शौकिन असतात.

परफ्यूम

परफ्यूम लावल्याने आपल्या शरीरातील घामाचा दुर्गंध नाहीसा होतो आणि एक छानसा सुगंध दरवळतो.

सुगंध

पण जास्त परफ्यूम लावल्याने नुकसान देखील होऊ शकते. चला याबद्दल  जाणून घेऊया.

नुकसान

परफ्यूममधील केमिकल त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा पुरळ निर्माण करू शकतात.

अ‍ॅलर्जी

जास्त परफ्यूम लावल्यामुळे दम्याचे रुग्ण किंवा अ‍ॅलर्जी असलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यात अडचण येऊ शकते.

श्वसन समस्यांमध्ये वाढ

तीव्र सुगंधामुळे डोकेदुखी, मळमळ किंवा चक्कर येण्याची शक्यता असते.

डोकेदुखी आणि मळमळ

जास्त सुगंधामुळे आजूबाजूच्या लोकांना अस्वस्थता वाटू शकते, विशेषतः बंदिस्त जागांमध्ये.

इतरांना त्रास