मेंदू थकल्याची 7 स्पष्ट लक्षणे जाणून घ्या

Life style

04 february 2026

Author:  नुपूर भगत

काम करताना लवकर लक्ष विचलित होणे, एकाच गोष्टीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित न करता येणे हे मेंदू थकल्याचे पहिले लक्षण असू शकते.

सतत लक्ष न लागणे

Picture Credit: Pinterest

लहान-लहान गोष्टी विसरणे, नुकतेच सांगितलेले शब्द किंवा काम आठवू न शकणे हे मानसिक थकव्याचे संकेत आहेत.

विसरण्याची सवय वाढणे

Picture Credit: Pinterest

शारीरिक विश्रांती घेतली तरी मन आणि डोके जड वाटणे, उत्साह न वाटणे हे मेंदूला पुरेशी विश्रांती न मिळाल्यामुळे होते.

सतत थकवा जाणवणे

Picture Credit: Pinterest

छोट्या गोष्टींवर राग येणे, चिडचिड वाढणे किंवा अचानक उदास वाटणे यामागे मानसिक ताण आणि मेंदूचा थकवा कारणीभूत असतो.

 चिडचिड आणि मूड स्विंग्स

Picture Credit: Pinterest

सोपे निर्णय घेणेही कठीण वाटणे, गोंधळ निर्माण होणे हे मेंदूवर जास्त ताण आल्याचे लक्षण आहे.

निर्णय घेण्यात अडचण येणे

Picture Credit: Pinterest

रात्री झोप न येणे, वारंवार जाग येणे किंवा जास्त झोपूनही ताजेतवाने न वाटणे हे मेंदू थकलेला असल्याचे संकेत देतात.

झोपेच्या समस्या

Picture Credit: Pinterest

सतत स्क्रीन पाहणे, विचारांचा भार यामुळे डोकेदुखी, डोळे जळजळणे किंवा जड वाटणे ही लक्षणे दिसतात.

डोकेदुखी 

Picture Credit: Pinterest